अण्णांच्या आंदोलनावरून विरोधक आक्रमक

August 16, 2011 9:18 AM0 commentsViews: 1

16 ऑगस्ट

अण्णा हजारे यांना आज सकाळी अटक करण्यात आली. अण्णांच्या या अटकेचे पडसाद संसदेतही उमटले. सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षाची बैठक आता सुरु झाली आहे. त्यात विरोधी पक्षातील नेते सहभागी झाले होते. संसदेच्या कामकाजावर 3 दिवस बहिष्कार घालण्याचा सीपीआयचा प्रस्ताव आहे या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. अण्णा हजारे यांना आज सकाळी अटक करण्यात आली. अण्णा हजारे यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर घाला आहे अशी टीका विरोधकांनी केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबद्दल निवेदन द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांच्या या गोंधळामुळे दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

close