मुंबईत अण्णांच्या समर्थकांचा एल्गार

August 16, 2011 4:17 PM0 commentsViews: 5

16 ऑगस्ट

मुंबईतही जनलोकपालच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. तरुणाबरोबरच ज्येष्ठ नागरिकही सकाळपासूनच आझाद मैदानात जमायला सुरुवात झाली. त्याआधी सीएसटी स्थानकाबाहेर इंडिया अगेन्स्ट करप्शनचे स्वयंसेवक लोकपालबिलाच्या आंदोलनात सहभागी होण्याकरता आवाहन करत असल्याचं पाहायला मिळाले.

आझाद मैदानावर लोक जमायला लागल्यावर पोलिसांनी त्यांना अटकाव केला. तेव्हा आझाद मैदानाच्या समोरच्या रस्त्यावर तरुणांनी ठिय्या आंदोलन केलं. पोलीस आंदोलनालाही विरोध करु लागल्यावर सुरु झालं जेलभरो आंदोलन.

अण्णांच्या समर्थनार्थ आझाद मैदानात सह्यांची मोहीम राबवण्यात आली. संध्याकाळपर्यंत तीन हजार लोकांनी सह्या करुन आपला पाठिंबा दर्शवला. माटुंग्यातही पोलीस स्टेशनबाहेर आंदोलक आक्रमक झाले होते. अण्णांच्या समर्थनासाठी उद्यापासून गिरणी कामगारही रस्त्यावर उतरणार आहेत.

close