शिवसेनेचा आजरा साखर कारखान्यावर मोर्चा

November 15, 2008 8:49 AM0 commentsViews: 70

15 नोव्हेंबर, कोल्हापूरऊस दराच्या मागणीसाठी काल कोल्हापूरमध्ये आजरा साखर कारखान्यावर शिवसेनेनं मोर्चा काढला. मात्र आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना अटक केल्यानं रस्त्यावर टायर जाळून त्याचा निषेध करण्यात आला. ऊसाचा पहिला हप्ता प्रति-टन पंधराशे रूपये देण्याच्या मागणीसाठी आजरा साखर कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत बरीच खडाजंगीही झाली. मात्र या चर्चेतून काही निर्णय होऊ शकला नाही.

close