अण्णांच्या अटकेबाबत केंद्रीय गृहमंत्रालय, पोलिसांना नोटीस

August 16, 2011 4:57 PM0 commentsViews: 4

16 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या अटकेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केंद्रीय गृहसचिव आणि दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली. आजच्या प्रकरणावर दोन आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. अनिरुद्धसुधन चक्रवर्ती या मानवाधिकार कार्यकर्त्याने पोलिसांच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या अटकेमुळे घटनेतल्या तरतुदी आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचा भंग झाल्याचे चक्रवर्ती यांनी याचिकेत म्हटलं होतं. त्यावर मानवाधिकार आयोगानेही नोटीस बजावली.

close