सिब्बल यांची सभा उधळली

August 16, 2011 5:55 PM0 commentsViews: 2

16 ऑगस्ट

अण्णा हजारे यांना अटक करण्यात आली. अण्णांच्या अटकेच्या निषेधात लोकांच्या संतापाचा फटका संध्याकाळी केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनाही बसला. नवी दिल्लीत कपिल सिब्बलांच्या एका कार्यक्रमात अण्णा समर्थकांनी गोंधळ घातला. कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांना तिहार जेलच्या ज्या सेलमध्ये ठेवण्यात आले. त्याच सेलमध्ये अण्णा हजारेंना ठेवल्याची अफवा पसरली. त्यामुळे अण्णा समर्थक संतापले. आणि त्यांनी कपिल सिब्बलांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली.

close