आता तिहार हेच जे.पी पार्क !

August 17, 2011 5:47 AM0 commentsViews: 2

17 ऑगस्ट

आता तिहार तुरुंग हेच जे.पी. पार्क अशी भूमिका नागरी समितीने घेतली आहे. तुरुंगामध्ये उपोषण करणार्‍या अण्णांनी दिल्ली पोलिसांना सवाल केलाय की तुम्हीच आता उपोषणासाठी जागा सांगा. बिनशर्त परवानगी दिली तरच तुरूंगाबाहेर जाणार हेही अण्णांनी ठामपणे सांगितले आणि जेलमध्ये उपोषण सुरूचं ठेवले आहे. आता तिहारलाच जेपी पार्क बनवा असा संदेशच अण्णांनी दिला.

त्यामुळे सदस्य आणि समर्थकांनी तिहार जेलबाहेर उपोषण सुरू केले आहे. अखेर अण्णांच्या समर्थनासाठी उतरलेल्या जनमताच्या रेट्यापुढे सरकारला माघार घ्यायला लागली. जनतेच्या रेट्यापुढे सरकार अखेर झुकलं. अण्णांची तिहार जेलमधून सुटका करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

पण अण्णांनी जेलमधून बाहेर यायला नकार दिला. जेपी पार्कवर उपोषणाची परवानगी द्यावी, अशी अण्णांनी सरकारला अट घातली. त्यामुळे आता काय करायचं असा सरकारपुढं पेच निर्माण झाला. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर तिहार येथे पोहोचल्या आहेत. मेधाताईही अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

मंगळवारी संध्याकाळी अण्णांच्या सुटकेचं पत्र तिहार जेल प्रशासनाकडे पोहचवले. राहुल गांधींच्या मध्यस्थीनंतर अण्णांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अण्णांनी कायदा मोडू नये, यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. पण तशी स्थिती राहिली नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला असं कारण दिल्ली पोलिसांनी दिले.

पण वस्तुस्थितीच अशी आहे की, अण्णांच्या अटकेनंतर देशभरात उमटलेली संतापाची लाट पाहून सरकार घाबरले. जनतेच्या देशव्यापी आंदोलनामुळे अडचणीत येण्याची भीती सरकारला वाटतेय. त्यामुळेच अण्णांच्या सुटकेचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.

close