शांतता राखण्यासाठीच अण्णांना अटक – पंतप्रधान

August 17, 2011 6:42 PM0 commentsViews: 6

17 ऑगस्ट

"अण्णा हजारे संसदेला आव्हान देत आहे. मी म्हणतो तोच कायदा आणा हे चालणार नाही. अण्णांनी स्विकारलेला मार्ग पूर्णपणे चुकीचा आहे. शांतता राखण्यासाठीच अण्णांना अटक करण्यात आली. मात्र त्यामुळे काल निर्माण झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं आश्वासन ही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले."

तसेच अण्णांना अटकेची सगळी जबाबदारी दिल्ली पोलिसांची असल्याचे पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सर्व नागरीकांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र त्यांना काही अटींचे पालन करावे लागेल असंही पंतप्रधानांनी म्हटले. संसदेत आज पंतप्रधानांनी निवेदन दिलं.

अण्णा हजारे यांना काल मंगळवारी अटक करून सरकारला जनतेच्या रोषाला सामोर जावं लागलं. अण्णांच्या अटकेनंतर उद्भवलेल्या पेचप्रसंगानंतर पंतप्रधानांनी आज संसदेत निवेदन सादर केले. लोकशाहीमध्ये सर्वांच्या मतांचा आदर करावा. केवळ आमचच मत ऐका अस चालणार नाही हा केवळ हट्टहास आहे.

राज्यघटनेत प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे. आपण आपलं मत मांडू शकता. अण्णा हजारेंनी संसदेच्या हक्कांनाच आवाहन दिलंय जनलोकपाल बिल पास करा असं आग्रह त्यांनी धरला हे योग्य नाही. सर्वांना नागरीकांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र त्यांना काही अटींचे पाल करावे लागेल. मंगळवारी पोलिसांनी अण्णांच्या सहकार्‍यांना ताब्यात घेतले होते त्यांना रात्रीच सुटका केली.

अण्णांच्या आंदोलनासाठी ज्या अटी लागू केल्या होत्या त्यांनी फेटाळून लावल्या या विरोधात अण्णा टीम सुप्रीम कोर्टात जाणार होती. पोलिसांच्या अटी अमान्यकरून अण्णांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून अण्णांना अटक करावी लागली.

लोकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आपण सर्वांनी निवडून दिलेल्या सभासदांना आपलं काम करू द्यावे. लोकपाल विधेयकाबद्दल सर्वांचे एकमत आहे. अण्णा हजारे आणि अण्णा टीमला विधेयकाबाबत आपले मत व्यक्त करण्यासाठी संधीही देण्यात येईल असं आश्वासन यावेळी पंतप्रधांनानी दिले. तसेच संसदेचे कामकाज सुरळीत पार पडू देण्याचे आवाहनही पंतप्रधांनानी केले.

पंतप्रधान म्हणतात,

'काल सकाळी दिल्ली पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला. अण्णा हजारे आणि त्यांचे समर्थक कायद्याचे उल्लंघन करण्याची शक्यता असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले. शांततेचा भंग होण्याची शक्यता होती.

त्यामुळेच अण्णा हजारे आणि इतर 6 जणांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक करण्यात आली. अलीपूर रोडमधल्या दिल्ली पोलीस अधिकार्‍यांच्या मेसमध्ये त्यांना नेण्यात आलं. आणि त्यानंतर मॅजिस्ट्रेटपुढे हजर करण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली नव्हती. मॅजिस्ट्रेटनी पर्सनल बॉण्ड्सवर जामीन देण्याचा प्रस्ताव दिला.

पण अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तो नाकारला. त्यामुळेच त्यांना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कायदा करण्याच्या संसदेच्या सार्वभौम अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या कोणत्याही घटनात्मक तत्वज्ञानाची मला माहिती नाही.

लोकपाल विधेयक आणि कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत सरकार योग्य तत्वांचा अवलंब करत आहे. अण्णा हजारे यांनी या तत्वांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. आणि संसदेवर आपलं जनलोकपाल लादण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रभावी लोकपालासाठी अण्णा हजारेंनी आपल्या आंदोलनात कदाचित उच्च आदर्शांचा वापर केला असेल. पण त्यांनी निवडलेला मार्ग मात्र पूर्णपणे चुकीचा आहे. आणि संसदीय लोकशाहीला धक्का देणारा आहे.' – मनमोहन सिंग

close