‘रामलीला’वर उपोषणास परवानगी ?

August 17, 2011 9:15 AM0 commentsViews: 4

17 ऑगस्ट

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे अजूनही तिहार तुरूंगात आहेत. अण्णा लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे. अण्णांना उपोषणासाठी सात दिवसांची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सरकारचे वाटाघाटीचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने अण्णांना उपोषणासाठी दोन पर्याय दिले आहेत. जेपी पार्कसोबतच रामलीला मैदानाचा पर्यायही सरकारने सुचवला आहे. रामलीला मैदान मोठं असल्याने तिथं पार्किंगची आणि आंदोलकांच्या संख्येची अट शिथिल होऊ शकते. दरम्यान जेपी पार्क इथं लागू केलेले 144 कलम मागे घेण्याची शक्यता आहे.

तिहार तुरूंगाबाहेर समर्थकांचा एकच जनसागर लोटला आहे. 'वंदे मातरम्', 'इन्कलाब जिंदाबाद', 'अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है', अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला आहे. मंगळवार रात्रीपासुन अण्णा तरूंगात ठाण मांडून होते. जेपी पार्कवर उपोषण करण्याची बिनशर्त परवानगी द्यावी अशी मागणी अण्णांनी लावून धरली . अण्णांचे लाखो समर्थक तुरूंगाबाहेर ठिय्या मांडून आहे. अण्णांचे सहकारी स्वामी अग्निवेश, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मनिष सिसोदिया, बाबा रामदेव यांनी तुरूंगात जाऊन अण्णांशी चर्चा केली.

close