दूषित पाण्यामुळे औरंगाबादकर आजारांनी बेजार

November 15, 2008 8:25 AM0 commentsViews: 12

15 नोव्हेंबर औरंगाबादसिटिझन जर्नलिस्ट संध्या जाधवनळाला येणा-या ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे औरंगाबादमध्ये सिडकोवासियांना कावीळ, गॅस्ट्रो आणि हिवतापाच्या आजारानं पछाडलयं. महापालिकेकडे तक्रारी करूनही तब्बल दोन महिन्यांपासून अडीचशेहून अधिक घरांना हे दुर्गंधीयुक्त पाणी येतं होतं. महापालिकेला जाग येईना म्हणून या भागातील महिलाच बनल्या आयबीएन लोकमतच्या सिटिझन जर्नलिस्ट . आमच्या सिटिझन जर्नलिस्ट संध्या जाधव यांच्यासह या भागातील महिलांनीच या समस्येवर प्रकाशझोत टाकला.औरंगाबादमधल्या जिजामाता कॉलनीमध्ये अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. गेले दोन महिने ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे इथे अनेक लोक आजारी पडत आहेत. परंतु महानगर पालिका याकडे लक्ष देत नाही. यापरिसरातील लोक सांगतात की दोन महिन्यापासून जे दूषित पाणी येत आहे. त्यामुळे अनेक लोक आजारी पडले आहेत. या दूषित पाण्याबाबत पालिकेला अर्ज दिलेला आहे. आता याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर या परिसरातील सर्व महिला महानगर पालिकेवर मोर्चा काढणार असं इथल्या महिलांनी ठणकावलं आहे.

close