अण्णांच्या आंदोलनाची ‘रेडिओ’वरून खबर

August 17, 2011 10:00 AM0 commentsViews: 3

17 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबद्दल आणि सगळ्या घडामोडींबद्दल देशभरात प्रचंड उत्सुकता आहे. खेड्यापाड्यांतही अण्णांना पाठिंबा देत अण्णांच्या प्रत्येक घडामोडीचा आढावा घेत आहे. टीव्ही, वर्तमानपत्र., इंटरनेटच्या माध्यमातून अण्णांचे आंदोलन घराघरात पोचलंच आहे.

पण जिथं वीज नाही, टीव्ही नाही, तिथं लोक रेडिओवरून अण्णांच्या आंदोलनाच्या बातम्या ऐकत आहेत. रेडिओला दिवसभर कान लावून लोकं काय चाललंलय याची उत्सुकतेने बातम्या ऐकत आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुरुल गावातील संभाजी भोसले दिवसभर रेडिओ कानाला लावून खबरबात जाणून घेत आहे.

ते जन्मत:च अंध आहेत. समाजाच्या भल्यासाठी लढणार्‍या अण्णांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे डोळ्यांनी पाहता येत नसलं तर कानांनी ते या सगळ्या आंदोलनाच्या बातम्या ऐकत आहेत. आणि सगळ्या गावकर्‍यांनाही ऐकवत आहे. त्यांच्याबरोबरच शेतावर जाणारे शेतकरी, मजूर असे कितीतरी जण या आंदोलनाबद्दल उत्सुक आहेत.

close