आंदोलन मोडण्यासाठी संसदेचा गैरवापर करु नका – वृंदा करात

August 17, 2011 10:48 AM0 commentsViews: 3

17 ऑगस्ट

आज संसदेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निवेदन सादर केले. अण्णांनी संसदेला आव्हान दिले आहे असं मत पंतप्रधानांनी निवेदनात व्यक्त केलं. पंतप्रधानांचं निवेदन सुरू असतानाच त्यातील मुद्दे आणि आरोप न पटल्याने विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. सामाजिक आंदोलनं चिरडून टाकण्यासाठी संसदेचा वापर कशाला करता असा संतप्त सवाल माकपच्या वृंदा करात यांनी केला.

अण्णा हजारे आपल्या मागण्यावर संसदेला आव्हान देत आहे. मी म्हणतो तोच कायदा आणा हे चालणार नाही. अण्णांनी स्विकारलेला मार्ग पूर्णपणे चुकीचा आहे. शांतता राखण्यासाठीच अण्णांना अटक करण्यात आली. मात्र त्यामुळे काल निर्माण झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं आश्वासन ही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले. संसदेत आज पंतप्रधानांनी निवेदन दिलं.

पंतप्रधानाचे निवेदन सुरू होते तर दुसरीकडे विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळाच्या वातावरणातच त्यांनी निवेदन संपवले आणि ते राज्यसभेत निवेदन सादर करायला गेले पण याला आक्षेप घेत आणि निवदेनाने समाधान न झालेल्या विरोधकांनी नंतरही गदारोळ केला. सरकारची ही मनमानी असल्याची टीका करत विरोधक आक्रमक झाले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली, आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झडल्या. आणीबाणीनंतरच्या काळाची आठवण ठेवा असा इशाराही यावेळी भाजपाच्या लालकृष्ण अडवाणींनी दिला.

close