समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटात लष्कराच्या आरडीएक्सचा वापर

November 15, 2008 11:52 AM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर नाशिकदीप्ती राऊतदेवळाली कॅम्पमधून 2006 साली 60 किलो आरडीक्स बाहेर पडल्याची खळबळजनक माहिती एटीएसच्या अधिका-यांनी दिलीआहे. समझौता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हे आरडीएक्स वापरलं गेल्याची माहितीही यावेळी देण्यात आली . 18 फेब्रुवारी 2007मध्ये समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 68 लोक ठार झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेला लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत याला नाशिक कोर्टात हजर केलं गेलं. त्यावेळी त्याला 18 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली.पुरोहित हा या बॉम्बस्फोटामागचा मास्टरमाइड होता. दरम्यान लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यानं आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. पुरोहितच्या कुटुंबानं त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात पुरोहितची आर्मी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली.

close