पोलिसांच्या मागे लपून कारवाई – जेटली

August 17, 2011 1:43 PM0 commentsViews: 2

17 ऑगस्ट

संसदेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निवेदन सादर केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यानंतर राज्यसभेतही निवेदन दिल्यानंतर विरोधकांनी शेम शेमच्या घोषणा देत निवेदनातल्या मुद्द्यांना तीव्र विरोध केला. भाजपच्या अरुण जेटलींनी सरकार नक्की कोण चालवतंय असा सवाल करत पोलिसांच्या मागे लपून कारवाई का करता असा संतप्त सवाल केला.

सरकारला आंदोलन हाताळता आलं नाही अशी टीकाही जेटलींनी केली. भ्रष्टाचार संपवण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवा असं आवाहन करत आम्ही जनलोकपाल सदस्यांच्या सगळ्या मागण्यांशी सहमत नाही मात्र तरीही त्यांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे तो हिरावून कसा घेता असा सवाल जेटलींनी केला.

close