अण्णांना पाठिंबा : औरंगाबादमध्ये कडकडीत बंद

August 18, 2011 9:10 AM0 commentsViews: 5

18 ऑगस्ट

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या औरंगाबाद बंदला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. नागरिकांंच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मुख्य बाजारपेठेसह शहरातील इतर भागातही व्यवहार ठप्प झाले आहेत.

अण्णांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात सर्वप्रथम औरंगाबदमध्येच बंद पाळण्यात आला. आपण बघू शकतो. ही दृष्ये औरंगाबादच्या बाजारपेठेतील दुकाने बंद आहेत. व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे शहरातील सर्वच भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली.

शैक्षणिक संस्थांनीही बंद पुकारल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शाळा, कॉलेज बंद करून विद्यार्थ्यांनी निदर्शन केली. बाजारपेठेत कडकडीत बंद पाळून, "अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देण्यात आल्यात.

सर्वात विशेष म्हणजे औरंगाबादच्या हॉटेलमालकांनीही सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत बार बंद ठेवून अण्णांना पाठिंबा दिला. निराला बाजार, शहांगज, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेटसह रोशनगेट, कटकटगेट, सिडको हडको, जयभवानीनगर, शिवाजीनगर अशा सर्वच भागात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.

बंदसोबतच विभागीय आयुक्त कार्यालयावर एक मोठा मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते. प्राध्यापक, विद्यार्थी, मोलकरणी, कामगार, वकिल डॉक्टर, इंजिनिअर आणि युवकांनी मोर्चात सहभाग नोंदविला. दिवसभर शहरात उत्साहाने मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे शहरातील रस्त्यांना अक्षरश जत्रेचं रूप आलं होतं.

close