राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थांचा हंडा मोर्चा

August 18, 2011 8:44 AM0 commentsViews: 1

18 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मागील तीन दिवसांपासुन अण्णा तिहार तुरूंगात आहे. पण अण्णांची सुटका झाल्यानंतर त्यांना तिहारमध्ये साध्या सुविधाही मिळत नाही हे अण्णांचे सचिव सुरेश पठारे यांनी सांगितले. तीन दिवसांपासुन आंघोळ करायला पाणीही मिळालं नसल्याचं कळलं. त्यामुळे आता राळेगणसिद्धीचे गावकरी संतापले आहेत. सरकार निषेध करण्यासाठी राळेगणकरांनी हंडा मोर्चा काढला. सकाळी गावकरी आंघोळ न करता रस्त्यावर उतरले. बादली, हंडा डोक्यावर घेऊन पाणी द्या,पाणी द्या, अण्णांना पाणी द्या अश्या घोषणा त्यांनी दिल्या.

close