अण्णांना पाठिंबा : जळगावमध्ये तरुण रस्त्यावर

August 18, 2011 10:23 AM0 commentsViews: 5

18 ऑगस्ट

अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी जळगावला युवावर्ग रस्त्यावर उतरला आहे. शहरातील सर्व महाविद्यालये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त बंद केली असून हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी आंदोलनात भाग घेतला आहे.

शहरातील एम. जे. कॉलेज, लॉ कॉलेज, इंजीनिअरिंग कॉलेज, सरकारी आयटीआय, नूतन मराठा महाविद्यालय यासह बेंडाळे महिला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे.

अण्णा हजारे यांना युवकांनी जाहीर पाठिंबा दिला असून ही एका नव्या क्रांतीची सुरुवात असल्याचे या युवकांचे म्हणणं आहे. सरकारने अण्णांच्या बाबतीत आपली भूमिका बदलली नाही तर पाठिंबा देण्यासाठी सर्व महाविद्यालय बेमुदत बंद करु असा निर्धार या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला.या आंदोलनात युवतींचा उत्स्फूर्त आणि लक्षणीय सहभाग होता.

close