बेस्ट फाईव्ह प्रकरणी राज्य सरकार पास

August 18, 2011 12:14 PM0 commentsViews:

18 ऑगस्ट

बेस्ट फाईव्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा निकाल लागला. राज्य सरकार हा खटला सुप्रीम कोर्टात जिंकला आहे. त्यामुळे राज्यातल्या 10 वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

बेस्ट फाईव्ह प्रकरणी राज्य सरकार उच्च न्यायालयातील खटला हरले होते. सीबीएसईच्या पालक – विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात ही केस दाखल केली होती.

पण राज्य सरकार सुप्रीम कोर्टात अपिलात गेलं. तत्कालीन शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. आणि अखेर एसएससी विद्यार्थ्यांच्या बाजुने सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. त्यामुळेे 10वीचे विद्यार्थी या निर्णयाने खूश झाले आहेत.

close