आयबीएन नेटवर्कतर्फे ‘रिअल हिरों’चा गौरव

August 18, 2011 12:58 PM0 commentsViews: 2

18 ऑगस्ट

आयबीएन नेटवर्क आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सहयोगाने दरवर्षी रिअल हिरोज पुरस्कार दिले जातात. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी निस्वार्थीपणे काम करणार्‍या असाधारण व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. रिअल हिरोजचं यंदाचं हे चौथं वर्ष होतं. मंुबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये रिअल हिरोजचा हा दिमाखदार सोहळा पार पडला.

पर्यावरण, महिला सबलीकरण, क्रिडा, शिक्षण, मुले आणि युवक अशा विभागांमध्ये उलेख्खनिय कामगिरी करणार्‍या देशभरातील 24 जणांचा रिअल हिरोजनं सन्मान करण्यात आला. उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी, सरोद वादक उस्ताद अमजद अली खाँ, चित्रपट निर्माते यश चौप्रा, गायिका आशा भोसले आणि क्रिकेटपटू अनिल कंुबळे यांनी या रिअल हिरोजना हा पुरस्कार प्रदान केला.

सन्मान चिन्ह आणि 5 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या सर्व रिअल हिरोसच्या कहाण्या पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात आल्या. डॉ. अभय बंग आणि त्यांची पत्नी राणी बंग यांना जीवन गौरव पुस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

close