प्रवाशांच्या आंदोलनानंतर मोटरमन ‘लाईन’वर

August 18, 2011 1:16 PM0 commentsViews: 4

18 ऑगस्ट

बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपामुळे आज दिवसभर मुंबईकरांना धक्के खावे लागले. यात भरातभर म्हणून मध्य रेल्वेचे मोटरमन संध्याकाळी अचानक संपावर गेले. चर्चगेटवरुन कोणतीही लोकल पुढे सरकत नव्हती. मोटारमनच्या संपाचा समाचार घेत नागरिकानी आंदोलनाचा पवित्रा घेतला. नागरिकांचे आंदोलन पाहुन संपावर गेले मोटरमन ताबडतोब 'लाईन'वर आले. आणि आपला संपमागे घेतला.

नेमकी संध्याकाळची वेळ ही मुंबईकरांची घरी जाण्याची वेळ. नेमका हाच वेळ साधून 65 मोटारमन आपण आजारी असल्याचे सांगून मोटारमन अचानक संपावर गेले. मलकित सिंग या मोटारमनला अपघात केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आले होते. एका अपघातामुळे बडतर्फ का केले असा सवाल विचारण्यासाठी गेले मोटारमन अचानक संपावर गेले. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. एकीकडे देशात परिवर्तानाचे वारे वाहत असताना असं संप नागरिकांनी खपवून घेतला नाही. मोटारमन विरोधात घोषणा देत नागरिकांनी चर्चगेट परिसर दणाणून सोडला. नागरिकांचे हे रुप पाहुन मोटारमन लाईनवर आले. आणि आपला अचानक संप मागे घेतला.

close