अण्णांना पाठिंबा : नाशिककरांचा विराट मोर्चा

August 18, 2011 3:54 PM0 commentsViews: 3

18 ऑगस्ट

जनलोकपाल विधेयकाच्या पाठींब्यासाठी आज शेकडो नाशिककर रस्त्यावर उतरले होते. या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मार्चा काढला. यामध्ये नाशिकमधील सर्व उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि विद्यार्थी संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

अनंत कान्हेरे मैदानापासून ते हुतात्मा स्मारकापर्यंत हा मोर्चा निघाला. विशेष म्हणजे सर्वपक्ष संघटना सहभागी होऊनही कोणत्याही रंगाचा स्वतंत्र झेंडा यामध्ये दिसून आला नाही. तर सगळ्यांच्या हातांमध्ये आवर्जून तिरंगा होता. आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये सातत्याने भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतोय म्हणून त्यांच्यात संताप होता.

या मोर्चामध्ये कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कोण्याच्याही एक छत्री निमंत्रणा शिवाय अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि एकत्रितपणे नाशिकमधल्या सर्व संस्था, संघटना यावेळी एकत्र आल्या.

close