अण्णांच्या आंदोलनाची घेतली जगभरातील माध्यमांनी दखल

August 18, 2011 6:09 PM0 commentsViews: 1

18 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या आंदोलनाने केवळ देशभरातल्या मीडियाचंच लक्ष वेधलं नाही. तर जगभरातल्या आघाडीच्या वर्तमानपत्रांनी, न्यूज चॅनेल्सनी आणि वेबसाईट्सनी अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे.

वॉशिंग्टन टाईम्स – साध्या कपड्यांतले 73 वर्षांचे अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे आयकॉन बनलेतवॉल स्ट्रीट जर्नल – अडचणीत आलेल्या सरकारनं शांततापूर्ण आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलाडेली मेल – भ्रष्टाचाराला वैतागलेल्या भारतीयांना अण्णांच्या आंदोलानामुळे नवी प्रेरणा मिळालीयद टेलिग्राफ – राजकारणी आणि सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांच्या असलेल्या रागाला अण्णा हजारेंमुळे धार मिळालीय बीबीसी – अण्णांना मिळत असलेला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मनमोहन सिंग सरकारसाठी चिंतेची गोष्ट आहे पीपल्स डेली – भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते अण्णा हजारे यांच्या अटकेनंतर सुरू झालेलं देशव्यापी आंदोलन आता पेटलंयडॉन – पाकिस्तानातही अशाच प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ आलीय

close