अण्णांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी करण्याची तयारी

August 19, 2011 5:07 PM0 commentsViews: 1

19 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत दिल्लीतील नेते निर्णय घेत आहेत. पण मध्यस्तीसाठी केंद्राने मदत मागितल्यास आम्ही ती देऊ असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे काँग्रेस सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. नागरी समितीशी कशी चर्चा करता येईल अण्णांची समजुत काढता येईल असा प्रयत्न सरकार करत आहे. दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे राज्यातील नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा सध्या प्रदेश काँग्रेसमध्ये आहे. त्या पार्श्वभूमिवर केंद्राने मदत मागितल्यास आपण मध्यस्थी करायला तयार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सक्षम लोकपाल विधेयक झाले पाहिजे अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

close