अण्णांच्या पाठिंब्यावरून काँग्रेसमध्येच मतभेद !

August 19, 2011 5:42 PM0 commentsViews:

19 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. थोड्याचं वेळापूर्वी ही बैठक संपली. टीम अण्णांकडून चर्चेसाठी औपचारीक विचारणा झाली. तर सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. अण्णांच्या आंदोलनाला देशभरातून, मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघितल्यानंतर आता काँग्रेस आपल्या भूमिकेवर फेरविचार करत आहे.

अण्णांच्या पाठिंब्यावरून आता काँग्रेसमध्येच मतभेद झाले आहे. तीन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते अण्णांवर हल्लाबोल करत होते. आता मात्र काही नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. अण्णा हजारे यांना अटक करणं ही चूक होती असं खासदार संदीप दीक्षित यांनी म्हटले. तर अण्णा हजारे हे देशाचे हीरो आहेत असं केंद्रीय राज्यमंत्री हरीश रावत यांनी म्हटले.

close