खासगी जनलोकपाल विधेयक मांडणार – वरुण गांधी

August 19, 2011 5:50 PM0 commentsViews: 1

19 ऑगस्ट

जनलोकपाल विधेयक हे सर्वंकष नाही. पण, सरकारच्या विधेयकापेक्षा ते निश्चितच चांगलं आहे, असं भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी म्हटलं आहे. पुढच्या आठवड्यात खासगी सदस्य विधेयकांतर्गत संसदेत जनलोकपाल विधेयक मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच राजीव चंद्रशेखर यांनी राज्यसभेत तर तेलुगु देसमच्या खासदाराने लोकसभेत खासगी विधेयक मांडले.

दरम्यान, इतर राजकीय पक्षांकडूनही आता अण्णांना पाठिंबा मिळत आहे. 9 राजकीय पक्षांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. सीपीएम, सीपीआय, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी (रिव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टी), तेलुगू देसम, ऑल इंडिया अण्णा द्रमुक, बिजू जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांचा यात समावेश आहे. येत्या 23 ऑगस्टला ते भ्रष्टाचाराविरोधात निदर्शनं करणार आहेत. ज्युडिशिअल अकाऊंटीबिलीटी बिल लवकरात लवकर मांडावे आणि काळा पैसा भारतात आणावा, याचीही मागणी हे पक्ष करणार आहेत.

close