माघार घेणार नाही !

August 20, 2011 9:15 AM0 commentsViews: 4

20 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. रामलीला मैदानावर अण्णांच्या समर्थकांची गर्दी आता वाढू लागली आहे. आपलं वजन साडे तीन किलोनं कमी झालं असून थोडा अशक्तपणा वाटत असल्याचे अण्णांनी आज सकाळी सांगितले. पण जनलोकपाल विधेयक येईपर्यंत माघार घेणार नसल्याचे अण्णांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. समर्थकांनी माझ्या प्रकृतीची काळजी करु नये, मी अजूनही लढा देण्यासाठी सक्षम आहे, अण्णांनी सांगितले.

रामलीला मैदानात नागरिकांनी गर्दी केली आहे. भारत माता की जयच्या घोषणांनी रामलीला मैदान सध्या गाजतं आहे. रामलीला मैदानावरुन अण्णा हजारेंनी सरकारला इशारा दिला. अण्णांनी सरकारला 30 तारखेपर्यंतची मुदत दिली. 30 तारखेपर्यंत मागण्या मंजूर झाल्या नाही तर देशभर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. जनलोकपाल मंजूर झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार अण्णांनी व्यक्त केला.

close