बास्केटबॉलचा बादशाह रॉबर्ट पॅरिश मुंबईत

November 15, 2008 12:44 PM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर मुंबईऋजुता सटवेबास्केटबॉल खेळाच्या प्रसारासाठी, बास्केटबॉलचा बेताज बादशाह रॉबर्ट पॅरिश सध्या भारतात आला आहे. दिल्ली, बंगलोर पाठोपाठ आता तो मुंबईत दाखल झाला आहे. पुढचे तीन दिवस शहरातल्या शाळांना भेटी देऊन तो मुलांना बास्केटबॉल शिकवणार आहे. सात फूट एक इंच उंचीचा रॉबर्ट पॅरिश एनबीए बास्केटबॉलच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजे तब्बल 21 हंगाम खेळलाय. व्यावसायिक खेळातून बाहेर पडल्यानंतर आता त्याने बास्केटबॉलच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतलं आहे. बास्केटबॉल हा भारताचा नंबर वन खेळ नसलातरी या वर्कशॉपला मिळालेला प्रतिसाद वाखाणण्यासारखा होता. त्याला कारणच तसं होतं मुलांना बास्केटबॉलच्या टीप्स मिळणार होत्या थेट बास्केटबॉल गुरु रॉबर्ट पॅरिश यांच्याकडून. राबर्टला भारतात आणण्यासाठी पुढाकार घेतला खुद्द एनबीएने. भारतातल्या शाळकरी मुलांत या खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ज्युनिअर एनबीए कार्यक्रम सुरू केला आहे.

close