अण्णांना पाठिंबा : राळेगणसिध्दीत मानवी साखळी

August 20, 2011 11:35 AM0 commentsViews: 1

20 ऑगस्ट

अण्णा हजारे दिल्लीत रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. तर अण्णा हजारे यांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत अण्णांना पाठिंबा द्यायला गावकरी रोज नवनवीन पद्धतीने आंदोलन करत आहे. आज गावकर्‍यांनी मानवी साखळी करुन भ्रष्टाचाराला विरोध केला. यादव बाबा मंदिरापासून सुरू झालेल्या साखळीत लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वच सहभागी झाले होते. दरम्यान राळेगणमध्ये मेंढपाळ समाजाच्या नागरिकांनी आपला पारंपरिक नाच करत आंदोलनाला पाठिंबा दिला.

close