सीपीएमचे ज्येष्ठ डॉ.एम.के.पंधे यांचे निधन

August 20, 2011 11:38 AM0 commentsViews: 6

20 ऑगस्ट

सीपीएमचे ज्येष्ठ नेते डॉ. एम के पंधे यांचं दिल्लीत हृद्‌यविकारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये काल रात्री त्यांचं निधन झालं. सीेपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य असलेले मधुकर पंधे उत्तम ट्रेड युनियन लिडर म्हणूनही सर्वांना परिचीत होते. भारतातील एक सर्वात मोठी ट्रेड युनियन 'सीटू' चे जनरल सेक्रेटरी आणि त्यानंतर अध्यक्ष असताना त्यांनी कामगारांसाठी मोठं काम केलं. राजकारण आणि अर्थशास्त्रात पीएचडी केलेल्या पंधे नंतर कम्युनिस्ट पक्षाशी जोडले गेले ते शेवटपर्यंत. डाव्या विचारांशी प्रखर निष्ठा आणि कामगारवर्गाविषयीची तळमळ यामुळे एक ध्येयवादी, स्पष्टवक्ता नेता म्हणूनच पंधे यांची ओळख होती.

close