अरूणा रॉय मांडणार भ्रष्टाचाराविरोधी मसुदा

August 20, 2011 3:08 PM0 commentsViews: 1

20 ऑगस्ट

अण्णांना चुकीचा सल्ला मिळतोय, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या सदस्या अरुणा रॉय यांनी केली. आपल्या टीमने तयार केलेला मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे ठेवणार असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. अरुणा रॉय आणि त्यांच्या टीमने भ्रष्टाचारविरोधी संस्था कशी असावी याचा मसुदा तयार केला. अरुणा रॉय यांचा मसुदा

- भ्रष्टाचारविरोधी संस्था ही आर्थिक, प्रशासकीय आणि कायद्याच्या दृष्टीने स्वतंत्र हवी- एकाच संस्थेकडे अमर्यादित अधिकार एकवटले जाऊ नयेत- त्यासाठी भ्रष्टाचारविरोधी संस्थेचं विकेंद्रीकरण करावे- तक्रारदार आणि आरोपी या दोघांच्या बाबतीत या संस्थेची भूमिका निष्पक्षपाती असावी- तक्रारींची चौकशी करण्यासाठी अशा संस्थांना योग्य अधिकार आणि आर्थिक मदत हवी- ठरवून दिलेल्या वेळेत चौकशी पूर्ण करण्याचे बंधन असावे- लोकशाही संस्था अपयशी ठरल्या तरी त्यांना समांतर संस्था हा पर्याय नाही

close