खासदारांच्या घरापुढे धरणे धरा !

August 21, 2011 10:30 AM0 commentsViews: 3

21 ऑगस्ट

आंदोलकांनी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घराबाहेरही धरण आंदोलन करा आणि त्यांना विचारा तुम्ही खरचं जनलोकपालला पाठिंबा देताय का की फक्त गप्पा मारतात आणि जर त्यांना काही मुद्दे पटत नसतील तर त्यांनी इथं यावे आणि आमच्याशी चर्चा करावी. आम्ही त्यांच्याशीही चर्चा करायला तयार आहोत असं आवाहन टीम अण्णांनी केलं.

या देशाचे खरे मालक सर्वसामान्य जनता आहे, राजकारणी जनतेचे सेवक आहेत असा घणाघाती प्रहार करत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा ठाम निर्धार अण्णांनी व्यक्त केला. अण्णांच्या उपोषणाचा आजचा 6 वा दिवस आहे. रामलीला मैदानावरच्या स्टेजवरच आज सकाळी अण्णांसोबत नागरी समितीच्या सदस्यांची बैठक झाली.

आता आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, सरकारच्या रणनीतीवर कसं रिऍक्ट व्हायचं याची चर्चा या बैठकीत झाली. त्यानंतर बोलताना अण्णांनी जनतेला हे आवाहन केलं. खासदारांच्या घराबाहेरही धरण आंदोलन करा आणि त्यांना विचारा तुम्ही खरचं जनलोकपालला पाठिंबा देताय का की फक्त गप्पा मारतात आणि जर त्यांना काही मुद्दे पटत नसतील तर त्यांनी इथं यावे आणि आमच्याशी चर्चा करावी.

आम्ही त्यांच्याशीही चर्चा करायला तयार आहोत असं आवाहन टीम अण्णांनी केलं. या आंदोलनात मीडिया लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं काम करत असल्याचंही अण्णांनी म्हटले. त्याचबरोबर मीडियानंच हे आंदोलन देशभरात पोहोचवले याबद्दल आभारही व्यक्त केले.

close