अण्णांसोबत वाटाघाटीसाठी सरकारचा पुढाकार

August 21, 2011 6:30 PM0 commentsViews: 5

21 ऑगस्ट

दिल्लीसह देशात अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळणार्‍या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे अखेर अण्णांबरोबर केंद्र सरकारने अण्णांसोबत चर्चा सुरु केली. अण्णांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांना दिल्लीला बोलावून घेतलंय.

दरम्यान, विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेशचंद्र सरंगी यांना अण्णा यांच्या उपोषणमध्ये मध्यस्थी करण्यासाठी दिल्लीला पाठवले. काही वेळापूर्वी सरंगी अण्णांना भेटले.

सरंगी यांची अण्णांना ऑफर

- लोकपालची यंत्रणा स्वतंत्र असेल- यात इन्वेस्टिगेशन विंग आणि एक डायरेक्टर (प्रासीक्युटर) असेल- स्वतंत्र कोर्ट असेल- लोकपालची नेमणूक राष्ट्रपती करणार- लोकपालच्या निवड समितीत पंतप्रधान, दोनही विरोधी पक्ष नेते, हायकोर्टाचा मुख्य न्यायमूर्ती,एक सुप्रीम कोर्टाचा न्यायमूर्ती- केद्र लवकरचं न्याय पालिकेसाठी स्वतंत्र न्यायिक जबाबदारी बिल (जुडिशिअरी अकाऊंट बिल) आणणार काल संरगी यांनी रामलीला मैदानावर अण्णांशी प्रत्यक्ष भेटही घेतली. गेल्या 25 वर्षांपासून वरिष्ठ सनदी अधिकारी असलेल्या संरगीनी अण्णांशी यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत. सहकार सचिव, कृषी सचिव आणि नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि विलासराव देशमुख यांचे प्रधान सचिव असताना त्यांनी अण्णांशी अनेक प्रकरणात मध्यस्थी केली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकरनं केंद्र सरकारला विनंती करून उमेशचंद्र सरंगी यांना या मध्यस्थीसाठी दिल्लीला रवाना केले आहे.

close