सरंगी आज पुन्हा अण्णांची भेट घेण्याची शक्यता

August 22, 2011 10:00 AM0 commentsViews: 1

22 ऑगस्ट

महाराष्ट्राच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांनी दोन दिवसात अण्णांची चार वेळा भेट घेतली. अण्णांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सरंगी यांना दिल्लीला बोलावून घेतले. सरंगी यांनी याआधी अनेक वेळा अण्णांच्या आंदोलनाच्यावेळी यशस्वी तोडगा काढला होता. त्यामुळे विलासराव देशमुख आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेशचंद्र सरंगी यांना अण्णा यांच्या उपोषणमध्ये मध्यस्थी करण्यासाठी दिल्लीला पाठवले. आज परत सरंगी अण्णांची भेट घेण्याची शक्यता आहे. सरंगी यांची अण्णांना ऑफर

- लोकपालची यंत्रणा स्वतंत्र असेल- तपास विभाग आणि चौकशी अधिकारी असणार- स्वतंत्र कोर्ट असेल, – लोकपालची नेमणूक राष्ट्रपती करणार- लोकपालच्या निवड समितीत पंतप्रधान – दोनही विरोधी पक्ष नेते, हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि एक सुप्रीम कोर्टाचा न्यायमूर्तीचा समावेश असेल- केद्र लवकरचे न्याय पालिकेसाठी स्वतंत्र न्यायिक जबाबदारी बिल (जुडिशिअरी अकाऊंट बिल) आणणार

close