सरकारी लोकपाल विधेयक कमकुवत – अरुणा रॉय

August 21, 2011 11:00 AM0 commentsViews: 2

21 ऑगस्ट

सरकारी लोकपाल विधेयक कमकुवत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या सदस्या अरुणा रॉय यांनी केली. मजबूत लोकपाल विधेयकासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. 30 ऑगस्टपर्यंतचा आग्रह धरणं चुकीचं आहे, असं मतही रॉय यांनी व्यक्त केलं. आयबीएन-लोकमतला त्यांनी आज एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. लोकपाल आणि जनलोकपाल प्रमाणेच राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्या अरुणा रॉय यांनीही लोकपालचा नवीन मसुदा तयार केला. हा मसुदा नेमका काय आहे हे त्यांच्याच कडून जाणून घेऊयात. अरुणा रॉय यांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत पहा आज संध्याकाळी 6.30 आणि रात्री 10.30 वाजता फक्त आयबीएन लोकमतवर…

close