खासदारांच्या घरापुढे अण्णा समर्थकांचे धरणे आंदोलन

August 22, 2011 10:46 AM0 commentsViews: 2

22 ऑगस्ट

'खासदारांच्या घरासमोर धरणे धरा त्यांना विचारा आपला जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा आहे का ?" अण्णा हजारे यांच्या आवाहनानंतर नांदेडमध्ये खासदार भास्करराव खतगावकर यांच्या घरापुढे अण्णा समर्थकांनी आंदोलन केले. यामध्ये शिवसेना, भाजप ,रिपाई, लोकभारती आणि जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश होता. खासदार घरी नसल्यामुळे आंदोलकांनी निवेदन भिंतीवर चिकटवले. तर नाशिकमध्ये खासदार समीर भुजबळ यांच्या घरावर मोर्चा काढला. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला. अण्णांनी कालच खासदारांच्या घरासमोर निदर्शनं करण्याचं आवाहन केलं होतं. भुजबळ फार्मवर हा मोर्चा काढण्यात आला.

close