पंतप्रधानांनीही बोलावली बैठक

August 22, 2011 12:40 PM0 commentsViews: 7

22 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस सुरू झाला आहे. अण्णा टीमशी मध्यस्थीच्या मार्फत चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज संध्याकाळी 7:30 वाजता तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सर्व वरीष्ठ अधिकार्‍यांना बोलावले आहे. अण्णांच्या उपोषणाबद्दल काय भूमिका घ्याची हे ठरवलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान लोकपाल विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडलं जाऊ शकतं असं स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्टकेलंय. तसेच स्थायी समितीला विधेयकात बदल करण्याचे अधिकार आहेत असंही अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले.

आज अण्णांनी आयबीएन लोकमतशी बोलताना आपण पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा राहुल गांधी यांच्याशीच चर्चा करणार अशी माहिती दिली.आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी आज रामलीला मैदानावर जाऊन, अण्णा हजारेंची भेट घेतली. गैरसरकारी प्रतिनिधींसोबत चर्चा करणं अशक्य असल्याचे अण्णांनी यावेळी स्पष्ट सांगितले. यानंतर फक्त पंतप्रधान,पीएमओ किवा राहुल गांधींशीच चर्चा करु असं अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच अजूनपर्यंत सरकारकडून अधिकृत प्रतिनिधीनी भेट घेतली नसल्याचही अण्णांनी स्पष्ट केलं.

close