अण्णांच्या पाठिंब्यासाठी इंडिया गेटवर उसळला जनसागर

August 21, 2011 2:57 PM0 commentsViews: 1

21 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत इंडिया गेट ते रामलीला मैदान अशी भव्य रॅली सुरू आहे. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरी समितीने नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ आंदोलकांना रॅली घेऊन यायचे आवाहन केलं होतं. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आंदोलक मोठ्या संख्येने इंडिया गेटवर गटागटाने येत आहेत. अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरी समितीने आज संध्याकाळी नवीदिल्लीत इंडिया गेटजवळ आंदोलकांना रॅली घेऊन यायचं आवाहन केलं होतं. तर मुंबईत वांद्रे इथंही अण्णांच्या पाठिंब्यासाठी महारॅली काढण्यात आली. वांद्रे ते जुहू अशी महारॅली काढण्यात आली. हजारो मुंबईकरांनी या रॅलीत भाग घेतला.

close