अण्णांना पाठिंबा : पुण्यात कलावंतांची रॅली

August 22, 2011 2:38 PM0 commentsViews:

22 ऑगस्ट

पुण्यामध्ये संगीत आणि नाट्य क्षेत्रातल्या कलावंतांनी अण्णा हजारेंना पाठिंबा व्यक्त करत रॅली काढली. देशभक्तीपर गीतं गात या कलाकारांनी जनलोकपाल बिलाला पाठिंबा व्यक्त केला. कोथरूड परिसरातील अलंकार पोलीस चौकीजवळ या रॅलीला सुरुवात झाली. रॅली काढून हे सर्व कलाकार एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणालाही बसले. यावेळी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी कविता म्हणून तर मधुरा दातार, केतकी आणि सुवर्णा माटेगावकर यांनी गाणं गाऊन अण्णांना पाठिंबा दिला तर ज्येष्ठ गायक अरूण दाते यांनी कलाकारांची पाठिंब्यांची भूमिका सांगितली.

close