पंतप्रधानांनी राजीनामा द्या – अडवाणी

August 21, 2011 5:54 PM0 commentsViews: 2

21 ऑगस्ट

हे सरकार भ्रष्टाचाराने बुडाले आहे, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपला पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी आपल्यापदाचा राजीनामा द्यावा आणि नव्याने निवडणूक घेण्यात याव्यात अशी मागणी अडवाणी यांनी केली आहे. तर दुसरीकडे अण्णांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. 30 ऑगस्टपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर झालंच पाहिजे. नाहीतर सरकारला सत्तेतून जावं लागेल असं अण्णांनी ठणकावले आहे. अण्णांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस उजाडला. सरकार अण्णांशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अण्णांच्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस लोकांचा पाठिंबा वाढतचं चालला आहे. सरकारने वेट ऍन्ड वॉचची घेतलेली भूमिका हात सरकाला महागात पडण्याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होतं आहे. अण्णांच्या आंदोलनात कोणत्याही पक्षांनी आतापर्यंत जाहीर सहभाग घेतला नव्हता.

अण्णांनी ही राजकीय पक्षांचा आंदोलनाचा टच येऊ दिला नाही. आता अचानक लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस सरकार हे 2 जी स्पेक्ट्रम, आदर्श सोसायटी , कॉमनवेल्थ घोटाळा आदी घोटाळ्यांनी भ्रष्टाचारात बुडाले आहे. सरकारची पोलखोल झाली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा देऊन नव्याने निवडणुका घ्यावात अशी मागणी अडवाणींनी केली.

सरकारचा चर्चेसाठी पुढाकार

दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी केंद्र सरकारने टीम अण्णांशी चर्चा करायला पुढाकार घेतला. लोकपालचा तिढा सोडवण्यासाठी टीम अण्णांशी अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू आहे अशी माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री हरीश रावत यांनी दिली. दरम्यान, इंदूरचे भैय्यूजी महाराज यांनीही अण्णांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांचीही भेट घेतली.

अण्णांशी जवळचे संबंध असणार्‍या लोकांच्या माध्यमातून ही चर्चा करण्यात येतेय. अण्णांबद्दल सरकारला आदर आहे आणि चर्चेतून लवकरच काहीतरी तोडगा निघेल अशी आशाही रावत यांनी व्यक्त केली. अण्णांनी घटनात्मक मर्यादा समजूत घ्याव्यात, असं आवाहन त्यांनी केले.

लोकपाल विधेयक संसदेच्या स्थायी समितीपुढे आहे. आणि ते मंजूर करण्यासाठी विशिष्ट डेडलाईन पाळणं शक्य नाही असं रावत यांनी स्पष्ट केले. मुख्य लढा हा भ्रष्टाचाराविरोधात असल्यानं टीम अण्णा आणि सरकार यांचा अंतिम उद्देश एकच आहे असंही रावत यांनी म्हटलं.

close