शार्पने बनवला 108 इंचाचा एलसीडी टी.व्ही.

November 15, 2008 1:07 PM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर मुंबई अभिषेक तेलंगघरात एलसीडी टी.व्ही असावा अशी टी.व्ही. शौकीनांची इच्छा असते. एलसीडी टि.व्ही किती मोठा असू शकेल असं तुम्हांला वाटतं… शार्पनं एकशे आठ इंचांचं एलसीडी डिस्प्ले पॅनेल मार्केटमध्ये आणलाय आणि याची किंमत आहे तब्बल 97 लाख रुपये ! यात क्रिस्टल क्लिअर हाय डेफिनेशन पिक्चर क्वालिटी मिळेल. विशेष म्हणजे हा अगदी चोवीस तासही सुरू राहू शकतो. पण हा एलसीडी घरासाठी नाही तर ऑफिसमध्ये वापरण्यासाठी बनवण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळ, हॉटेल्स, मॉल्स इत्यादी ठिकाणी वापरण्यासाठी कंपन्या हा एलसीडी जरूर घेतील असं कंपनीला वाटतं आहे. शार्पनंच जगातला पहिला एलसीडी टि.व्ही बनवला होता, जो अवघा तीन इंचाचा होता. आता शार्पच्या प्रगतीत सामील झाला आहे हा जम्बो एलसीडी टि.व्ही.

close