अण्णांबद्दल अपशब्द काढणार्‍या काँग्रेस नेत्यांची घृणा वाटते – विखे पाटील

August 22, 2011 6:19 PM0 commentsViews: 11

22 ऑगस्ट

आधीच सगळीकडून अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला आता त्यांच्या पक्षातूनही होणार्‍या कठोर टीकेला सामोरं जावं लागतंय. अण्णा हजारे यांचं आंदोलन हाताळताना काँग्रेस चूक करतं आहे. आंदोलनाबाबतची केंद्र सरकारची भूमिका अनाकलनीय आहे. त्याचबरोबर अण्णांबद्दल अपशब्द काढणार्‍या काँग्रेस नेत्यांची घृणा वाटते अशी जळजळीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात बोलताना केली. एवढंच नाही तर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या टोप्या उतरवून अण्णांच्या आंदोलनात सामील व्हावं असं आवाहनही बाळासाहेब विखे पाटील यांनी केलंय. तसेच वेळ न घालवता जनलोकपाल बिल पास करा त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.

close