..तर खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करा – अण्णा

August 23, 2011 6:21 PM0 commentsViews: 1

23 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस उजाडला आहे. 17 तासांनंतर आज अण्णांनी रामलीला मैदानावर समर्थकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनासाठी जास्तीत जास्त तरूणांनी रस्त्यावर उतरावे पण अंहिसक मार्गानेच आंदोलन करण्याचे आवाहन अण्णांनी केले. शिवाय 30 ऑगस्टपर्यंत जर जनलोकपाल विधेयकाबाबत काही तोडगा निघाला नाही तर सर्व खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन अण्णांनी सर्व समर्थकांना केले. आंदोलनात दारू पिऊन गोंधळ घालू नका, अशा प्रकारांमुळे आंदोलन बदनाम होईल. जीवन फक्त मौजमजेसाठी नाही असं आवाहनही अण्णांनी आंदोलकांना केले. माझं वजन कमी झालं असलं तरी माझी प्रकृती ठिक आहे असं अण्णांनी स्पष्ट केले. जनतेला खरं स्वातंत्र्य अनुभवता यावं म्हणून मी उपोषण करत असल्याचंही ते बोलले.

close