सुप्रिया सुळेंच्या घरासमोर निदर्शन

August 23, 2011 9:17 AM0 commentsViews: 3

23 ऑगस्ट

अण्णांनी खासदारांच्या घराबाहेर निदर्शन करण्याचे आवाहन केल्यानंतर आज पुण्यात सुप्रिया सुळेंच्या घरासमोर आज निदर्शन करण्यात आली. काल सुरेश कलमाडींच्या घरासमोर निदर्शन करण्यात आली होती.आज सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानासमोर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. जनलोकपालाच्या समर्थनार्थ यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

तर पुण्यापाठोपाठ कोल्हापूरातही खासदारांच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली. कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानासमोर निदर्शन करण्यात आली. खासदार मंडलिक यांनी जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा द्यावे अशी मागणी करण्यात आली.

कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या रुईकर कॉलनीतल्या निवासस्थानासमोर निदर्शन करण्यात आली. नाशिकमध्येही भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि प्रतापदादा सोनावणे यांच्या घरासमोर निदर्शन करण्यात आली. तर चव्हाण यांच्या कॉलेज रोड इथल्या निवासस्थानाबाहेर तर सोनावणेंच्या महात्मा नगर इथल्या घराबाहेर निदर्शनं करण्यात आली. तर गोंदियात खासदार प्रफुल पटेल यांच्या पालचौकातल्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं .

close