विलासरावांची मध्यस्थी नको – मेधा पाटकर

August 23, 2011 10:47 AM0 commentsViews: 5

23 ऑगस्ट

भ्रष्टारात गुंतलेल्या मंत्र्याची मध्यस्थी आम्हाला मान्य नाही. विलासराव देशमुख यांची मध्यस्थी आम्हाला नको अशी स्पष्ट प्रतिक्रिया अण्णांच्या सहकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली. त्याचबरोबर स्वच्छ चारित्र्याच्या मंत्र्याशी किंवा प्रतिनिधीशीच आपण चर्चा करु असं सांगताना त्यांनी पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा पुनरुच्चार केला.

आयबीएन लोकमतशी बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या की, सरकारचा अजून कोणताही ठोस पर्याय अजून आला नाही मात्र सरकारने चर्चेची तयारी दर्शवली आहे. हे अगोदर होऊ शकले असते पण आता जी काही चर्चा होणार आहे ती निर्णयाक व्हावी अशी अपेक्षा आहे. यासाठी सरकारच्या वतीने चर्चेसाठी येणार नेता, अधिकारी हा भ्रष्टाचार मुक्त असावा यातूनच पुढे चर्चा व्हावी. सरकारचा मसुदा आणि नागरी समितीच्या मसुद्यावर चर्चा करण्यात यावी यातील घटकांवर योग्य तो तोडगा काढण्यात यावा पण यात कोणती अडचण आहे हे कळत नाही. शासनाचे प्रतिनिधी येऊन आणि अण्णा टीमने एकत्र बसून यावर चर्चा करावी. आणि अण्णांच्या सहमतीने निर्णय व्हावा असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं. तसेच विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेऊ नये अगोदरच त्यांचावर काही आरोप आहे त्यामुळे जनताच सरकारला प्रश्न विचारू शकते की, तुमच्याकडे भ्रष्टाचारमुक्त नेता नाही का ? लोकपाल विधेयकाचा मसुदा जेव्हा तयार होत होता तेव्हा शरद पवार यांनीही माघार घेतला होता. यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करावी अशी आग्रहाची मागणी ही पुन्हा मेधाताईंनी केली.

close