राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थांचे आंदोलन

August 23, 2011 12:18 PM0 commentsViews: 2

23 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. आणि देशभरात आंदोलनांची राळ उठत आहे. अण्णांच्या खालावत्या प्रकृतीविषयी देशभरातून चिंता व्यक्त होत आहे. आणि राळेगणच्या रहिवाशांनाही हीच काळजी लागून राहिली आहे. आणि आता यावर तोडगा निघावा यासाठी राळेगण ग्रामस्थांनीही आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनात शाळकरी मुलंही सहभागी झाली होती. आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करु असा इशाराही राळेगणवासियांनी दिला आहे.

close