मीडियामुळेच राज ठाकरे यांना प्रसिद्धी मिळाली- शरद पवार

November 15, 2008 9:17 AM0 commentsViews: 13

15 नोव्हेंबर मुंबईमीडियामुळेच राज ठाकरेंना प्रसिद्धी मिळाली असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. मुंबईत गोवंडी इथे आयोजित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त एकात्मतेच्या मेळाव्यात ते बोलत होते.गेल्या काही दिवसांपासून मनसेने केलेल्या उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामुळे परप्रांतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. परंतु कोणालाही भीती बाळगण्याचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकाला पुरेसं संरक्षण मिळेल अशी हमी त्यांनी यावेळच्या भाषणात दिली. मीडियामुळेच राज ठाकरे यांना प्रसिद्धी मिळाली असा आरोपही त्यांनी मीडियावर केला.शरद पवारांच्या या भाषणावर मीडियाकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. मनसेच्या आंदोलनात मीडियाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची आपली भूमिका व्यवस्थित मांडली होती. पवारांचं हे विधान राजकीय हेतूने प्रेरित आहे असं सीएनएन आयबीएनचे एडिटर इन चीफ राजदीप देसाई याचं म्हणणं आहे. केंद्राने घेतेलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील नेते आपापली जबाबदारी टाळत आहेत.आणि म्हणून राज प्रकरणात ते मीडियाला दोष देत आहे.असं ते म्हणाले.राज प्रकरणात मीडियाने आपली भूमिका चोख बजावली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद कमी करून मनसेला पाठीशी घालण्याचं काम राज्य सरकारचं करीत होतं. राज्यातील समस्यातून जनतेची दिशाभूल करून आपल्या अपयशाचं खापर कोणावरतरी फोडायचं ही राजकारणी मंडळींची जुनीच खेळी आहे.अशा विधानामुळे राज्यातील जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. असं या भाषणाचं विश्लेषण आयबीएन लोकमतचे न्यूज एडिटर सुभाष शिर्के यांनी केलं

close