पंतप्रधानांचं अण्णांना पत्र

August 23, 2011 12:36 PM0 commentsViews: 8

23 ऑगस्ट

अण्णांच्या जनआंदोलनापुढे अखेर सरकारला एक झुकावे लागले आहे. पंतप्रधानांनी अण्णांना स्वत: पत्र लिहून अण्णांनी उपोषण मागे घ्यावे असं आवाहन केले आहे. एक प्रभावी लोकपाल विधेयक आणू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. तसेच आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची वैयक्तिक हमीही पंतप्रधानांना अण्णांना दिली. संध्याकाळी यासंदर्भात राहुल गांधी आणि पंतप्रधानांची एक बैठक झाली. जनलोकपाल विधेयक संसदेत मांडणार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. सभापतींनी मंजुरी दिल्यास जनलोकपाल विधेयक संसदेत सरकारी विधेयक म्हणून मांडता येईल. असंही पंतप्रधानांनी कळवले.

पंतप्रधानांनी अण्णांना लिहीलेलं पत्र

सरकारला तुमच्या प्रकृतीची चिंता आहे. देशाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. भ्रष्टाचाराविषयी तुमचे विचार योग्य आहेत. त्यात काही मतभेद असेलही मात्र ते फार जास्त नाहीत. सिव्हील सोसायटीच्या सुचना आणि सरकार मिळून सशक्त लोकपाल कायदा आणणार आहेत. सरकारची कुणाबरोबरही चर्चेची तयारी आहे. पावसाळी अधिवेशनात सादर झालेलं लोकपाल विधेयक सध्या स्थायी समितीकडे आहे. पण आताही सर्व पर्याय खुले आहेत. जनलोकपाल , सरकारी लोकपाल आणि अरुणा रॉय यांच्या मसुद्यावरही चर्चा केली जाईल. सध्याच्या सरकारी विधेयक ात अनेक बदल होवू शकतात. आम्ही जन लोकपाल विधेयक स्थायी समितीकडे पाठण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे विनंती करु तसेच आम्ही स्थायी समितीलाही तशी विनंती करु मला आशा आहे की तुम्ही उपोषण लवकर मागे घ्यालं – पंतप्रधान मनमोहन सिंग

दरम्यान, सरकार आणि टीम अण्णा यांच्यात आज पहिल्यांदाच थेट चर्चेला सुरुवात झाली आहे. सरकारच्या वतीने प्रणव मुखर्जी टीम अण्णांशी चर्चा करणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे. याबैठकीला टीम अण्णांकडून अरविंद केजरीवाल , प्रशांत भूषण यांची निवड करण्यात आली आहे. आज दुपारी केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद आणि अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही अशी माहिती बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी दिली. त्याचबरोबर बैठकीत झालेली चर्चा अण्णांना कळविणार आहे त्यानंतर मी सगळ्यांशी बोलेन असं केजरीवाल म्हणाले. तर बैठकीत कोणत्याही अजेंड्यावर चर्चा झाली. फक्त जे काही घडतंय ते जाणू घेण्याचा प्रयत्न केला असं सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले. या सगळ्यावर तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे असं खुर्शीद यांनी सांगितले.

close