अण्णांचे वजन 5.6 किलोंनी घटले

August 23, 2011 1:34 PM0 commentsViews: 4

23 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. अण्णांचे वजन पाच किलोनं कमी झालं आहे. पण स्टेजवर बसलेल्या अण्णांकडे लक्ष दिलं तर उपोषणाचा अण्णांच्या प्रकृतीवर परिणाम हे स्पष्टपणे जाणवतं आहे. अण्णांचं उपोषण 16 ऑगस्टला सुरु झालं. पण तेव्हा अण्णा रामलीला मैदानात उपोषणाला बसले ते 18 ऑगस्टपासून. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा आठवडा आहे. आठवा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि कालपासून अण्णांची तब्येत कालपासून थोडीशी खालावली आहे. अण्णांच्या प्रकृतीबद्दल सरकारला चिंता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.- उपोषणाच्या सातव्या दिवसापासून अण्णा थकलेले दिसत आहे- अण्णांच्या रक्तामध्ये, युरीनमध्ये किटॉन्सचं प्रमाणही वाढलंय- अण्णांचं वजन 5.60 किलोने घटलंय- आज अण्णांचा रक्तदाब : 82/124

close