अण्णांना पाठिंबा : टॅक्सी, अ ॅम्बुलन्स आणि ट्रॅक्टर मोर्चा

August 23, 2011 1:55 PM0 commentsViews: 2

23 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. देशभरात आंदोलनांची राळ उठली. रोज नवनवीन प्रकारची आंदोलन आता होत आहे. मुंबईत टॅक्सीचालकांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला. कफ परेडपासून या टॅक्सी चालकांनी मोर्चा काढला. यात जवळपास दोनशे टॅक्सीचालक सहभागी झाले होते.

टॅक्सीबरोबरचं मुंबईत ऍम्बुलन्स मोर्चाही निघाला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागातल्या खाजगी ऍम्ब्युलन्स चालकांनी हा मोर्चा काढला. तर नाशिकमध्ये शेतकर्‍यांनी जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मोठी ट्रॅक्टर रॅली काढली. नाशिक तालुक्यातील शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. 50 हून जास्त ट्रॅक्टर ट्रॉलीज यात सहभागी झाले होते.

close