सरकारने मागितला सकाळपर्यंत वेळ

August 23, 2011 5:46 PM0 commentsViews: 9

23 ऑगस्ट

टीम अण्णा आणि केंद्र सरकारमधील कोंडी अखेर फुटली. टीम अण्णांच्या प्रतिनिधींनी आज सरकारचे प्रतिनिधी प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक आणि चांगल्या वातावरणात झाल्याचे दोन्हीकडून सांगण्यात आलं. तर प्रणव मुखजीर्ंनी टीम अण्णांकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ मागितला आहे. अण्णांनी उपोषण मागे घेण्यात यावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले. मात्र सरकारने लिखित उत्तर दिल्यावरच अण्णांची समजुत घालता येईल असे टीम अण्णांनी सांगितले.

अण्णांच्या उपोषणाच्या आठव्या दिवशी अखेर सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतला. आज संध्याकाळी सरकारच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ट्रबलशूटर प्रणव मुखर्जी यांची चर्चेसाठी नियुक्ती केली. तर टीम अण्णांकडून अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आणि किरण बेदी यांची चर्चेसाठी निवड झाली. संध्याकाळी सात वाजता दोन्ही टीममध्ये चर्चा पार पडली.

यावेळी जनलोकपाल विधेयकाचा मसुदा संसदेच्या स्थायी समितीपुढे मांडण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली. पण विधेयक याच अधिवेशनात मांडा त्यावर मतदान घ्या आणि याच अधिवेशनात ते मंजूर करा या मागणीवर टीम अण्णा ठाम आहे. यासाठी संसदेच सत्र काही दिवस वाढवता येईल असंही टीम अण्णाचं म्हणणं आहे. उद्या चर्चेची दुसरी फेरी होईल. एक ते दोन वेळा चर्चा करावी लागेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

आज टीम अण्णांशी सरकारची पडद्यामागून चर्चा सुरू होती अशी चर्चा आज दुपारपर्यंत होती. पण चार वाजण्याच्या सुमारास अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यात बैठक झाली. अण्णांचे उपोषण सुरू झाल्यापासुन टीम अण्णा आणि सरकारमध्ये झालेली ही पहिली अधिकृत बैठक होती. त्यानंतर चर्चा प्रक्रियेला वेग आला.आणि प्रणव मुखर्जी यांच्या निवासस्थानी सकारत्मक बैठक पार पडली. प्रणव मुखर्जी यांच्यासोबत सलमान खुर्शीद आणि दिल्लाचे खासदार संदीप दीक्षित हेसुद्धा या चर्चेला उपस्थित होते.

close