मी अजून 9 दिवस उपोषण करू शकतो – अण्णा

August 24, 2011 2:00 PM0 commentsViews: 10

24 ऑगस्ट

जनतेचा पाठिंबा हीच माझी ऊर्जा आहे, त्यामुळे मी अजून 9 दिवस उपोषण करू शकतो असा इशारा अण्णांनी पुन्हा एकदा दिला आहे. संध्याकाळी साडे पाच वाजता अण्णांचे मेडिकल चेक अप झाल्यानंतर अण्णांनी पुन्हा एकदा माईक हाती घेतला आणि सरकारला इशारा दिला. सत्तेचं विकेंद्रीकरण करा यासह अण्णांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला.

आज अण्णांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. कालपर्यंत अण्णांचे वजन पाच किलो 60 ग्रॅमने कमी झालं होतं आज अण्णांचं वजन आणखी 200 ग्रॅमनं कमी झालंय. आज सकाळी जाहीर झालेल्या अण्णांच्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. काल पंतप्रधानांनी पत्र पाठवून अण्णांना उपोषण सोडण्याचं आवाहनं केलं होतं. आजही पंतप्रधानांनी अण्णांना आवाहन केलं की अण्णांनी ग्लुकोज घ्यावं. पण अण्णा मात्र उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

close